कळंब (प्रतिनिधी)
कळंब चे जावाई रामलिंग वैजिनाथ भुईभार यांनी एअर फोर्स मधुन निवृत्त झाल्यानंतर सैनिकांची अनेक कामे केल्यामुळे याची एअर फोर्स ने दखल घेऊन त्यांना पदक व प्रशस्ती पत्र जाहिर झाले असुन महाराष्ट्रातुन हे एकमेव व्यक्ती आहेत.
वायुव सेनेत रामलिंग वैजिनाथ भुईभार यांनी अॉनररी फ्लाइंग अॉफीसर म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्यसैनिक कै. शिवशंकर बप्पा घोंगडे यांचे ते मेव्हणे आहेत. भुईभार यांनी वायुव सेनेत ३८ वर्षे नौकरी केली आहे. या कालावधी मध्ये नौकरी बरोबर सामाजिक कार्याला सुध्दा वेळ देत होते. सेवानिवृत्त नंतर त्यांनी सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुर्ण वेळ दिला. त्यांनी सेवानिवृत्त नंतर कुटुंब पेशन्स, सैनिकाच्या निधनानंतर त्यांच्या विधवांना पेशन्स, मुलींचे लग्न, परदेशात शिक्षणाची संधी, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक समस्या चे निवारण करणे, त्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेणे, उपचार बाबत मार्गदर्शन करणे केले आहे. यासह पुणे येथील लोहगाव चे पॉली क्लिनिक स्थापन करणार त्यांचे योगदान मोठे असल्यामुळे त्यांना त्याचे फाऊडर मेंबर करण्यात आले आहे. भुईभार यांच्या या कामाची दखल घेऊन वायुवसेनेचे चिफ अॉफ दी एअर स्टाफ एअर चिफ मार्शल भदेरीया यांनी त्यांना पदक व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातुन फक्त तीन जणांचा सन्मान करण्यात आला असुन महाराष्ट्रातुन फक्त जामगाव (आ) चे भुमीपुत्र रामलिंग भुईभार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वस्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. 
 
Top