तुळजापूर /प्रतिनिधी : -
नगरपरिषद नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार कोषागारतून उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीसह अन्य तेरा मागण्यांसाठी नगरपरिषद संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती च्या वतीने सोमवार दि17रोजी. तुळजापूर नगरपरिषद कर्मचारी वर्गाने एक दिवसाचे लाक्षणिक कामबंद आंदोलन केले. यात सर्व कायम व रोजदारी मिळुन शंभर स्ञी -पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी आपल्या विविध मागण्याचे निवेदन नगराध्यक्ष रोचकरी व मुख्याधिकारी अशिष लोकरे यांना देण्यात आले . हे आंदोलन दत्ता सांळुके , सतिश टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
