तुळजापूर /प्रतिनिधी : -
शहरातील २५ सर्पमित्रांचा आनंद कंदले मित्रमंडळाच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा हस्ते सर्प मित्रांना विमा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सर्पमित्रांना अनेकवेळा धोका पत्कारून काम करावे लागते. कधीही अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे आनंद कंदले मित्रमंडळाच्या वतीने विमा काढण्यात आला. यावेळी युवक नेते विनोद गंगणे, संतोष बोबडे, नगरसेवक विजय कंदले, पंडित जगदाळे, विशाल रोचकरी, सुहास साळुंके, अविनाश गंगणे, नागेश नाईक, शिवाजी बोधले, रत्नदिप भोसले, किशोर दरेकर, रामराजू जाधव, दत्ता राठोड, अनंत मोगरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.