वाशी /प्रतिनिधी : -
ग्रामीण व शहरी भागातील महिला व किशोरवयीन मुली मध्ये मासीक पाळी मध्ये प्याड चा वापर करावा या उद्देशाने राज्यशासन मार्फत मार्च 2018 मध्ये अस्मिता योजनेची सुरवात करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर अस्मिता प्लस योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दि 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत मध्ये वाशी तालुक्यातील प्रत्येक गावात जागर अस्मितेचा योजना राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागा अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष वाशी मार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. किशोरवयीन मुली मध्ये मासिक पाळी च्या दरम्यान प्याडचा वापर वाढवणे व नोंदणीकृत समूहा मार्फत अस्मिता प्लस प्याड ची विक्री करून महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे ग्रामीण भागातील महिलांना कमी दरात चांगल्या दर्जा चे प्याड उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम वाशी तालुक्या अंतर्गत सर्व गावात कार्यरत crp, ctc, कृषिसखी, flcrp, बँकसखी , mec याच्या मार्फत जागर अस्मितेचा पंधरवड्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्याचा आज स्वातंत्र्यदीना निमित्त पंचायत समिती वाशी चे माननीय गट विकास अधिकारी खिल्लारे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या वेळी तालुका अभियान व्यवस्थापक वैशाली गायकवाड, तालुका व्यवस्थापक अर्चना गडदे, पांडुरंग निमकर ,प्रताप गलांडे ( विस्तार अधिकारी) , संदिप लोंढे ( प्रशासन साहाय्यक , प्रभाग समन्वयक अशोक बांगर कृषी विस्तार अधिकारी राठोड उपस्थित होते .