उस्मानाबाद / गोविंद पाटील -
महाराष्ट्र राज्यात लोकमान्य टिळकांनी साल १८९७ ला सर्व जनतेला श्री गणेशाची स्थापना करण्याची हाक दिली. त्यास प्रतिसाद देत उस्मानाबाद तालुक्यातील सर्वांत मोठे गांव असलेल्या बेंबळी गावातील नागरिकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास मोठया उत्साहात व जल्लोषात सुरुवात केली. दरम्यान या गणेशोत्सव परंपरेत कसला ही खंड पडू नये म्हणून श्री गणेशाच्या मुर्तीची कायमस्वरूपी स्थापना करण्यात आली. या श्री गणरायाच्या मुर्तीस आजोबा गणपती म्हणुन सर्वत्र ओळखे जाते. हा आजोबा गणपती लाखो भक्तगणांचे आराध्य दैवत असल्याने श्री गणेश विसर्जना दिवशी लाखो गणेश भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.
बेंबळीतील मराठवाड्यातील दुसरा तर महाराष्ट्रातला तिसरा क्रमांकाचा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व पोलिस अधिक्षकांनी कोराेचे संक्रमण रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व गणेश मंडळांना यंदा उत्सव सामाजिक उपक्रमांने साजरा करावा व सामाजिक आंतर ठेवून, मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मौजक्याच व्यक्तींच्या उपस्थित नित्य पुजा-अर्चा करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत. त्यास गणेश मंडळांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आजोबा गणेश मंडळाचा इतिहास
आजोबा गणेश मंडळाची स्थापना साल १९१२ ला करण्यात आली. यावेळी सदाशिव भडंगे, किसनराव मैंदर्ग, नागय्या स्वामी, गुंडोपंत्त कुलकर्णी, हरीभाऊ मोटे, रामभाऊ सांगवे पुढाकार घेऊन हे मंडळ स्थापन केले होते. पुढे १९४८ ला अधिकृत न्यास नोंदणी करण्यात आली. मराठवाड्यातील दुसरे मंडळ असल्याने वेगळे महत्व या मंडळास प्राप्त झाले आहे. २०१२ ला मंडळाने मोठ्या दिमाखात शताब्दी वर्ष साजरे केले. राज्यस्थान (मकरान) येथून नव्याने आणलेल्या देखण्या गारूच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
दरवर्षी मिरवणुकीचा जल्लोष
यावषी कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा होत आहे. बेंबळीत मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. गावात एकुण मानाचे पाच गणेश मंडळ आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ, (छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेंबळी), अहिल्यादेवी होळकर गणेश मंडळ, (खंडोबा मंदिर),विजय गणेश मंडळ,( विजयनगर),पाल क्षेत्रीय गणेश मंडळ, (धनगर गल्ली ), बाल गणेश मंडळ (हनुमान चौक) चा समावेश आहे. या मंडळांच्या वतीने जल्लोषात मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी बिंबळी गावाच्या परिसरातील नागरिकही येत असतात. सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी या मिरवणुकांमध्ये सहभागी होऊन सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला आहे.