कळंब / प्रतिनीधी
गणेशोत्सवा निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले, त्यामध्ये ३५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सध्या जगभरात  कोरोनाने थैमान घातले आहे,रक्ताचा तुडवडा पडल्यामुळे त्या अनुषंगाने कळंब येथे कथले चौकामध्ये श्री शहीद भगतसिंग गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुशिंगे,पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे,संभाजी ब्रिगेड चे अतुल गायकवाड,पत्रकार बालाजी निरफळ,शितलकुमार घोंगडे,मुस्तान मिर्झा ,ओंकार कुलकर्णी संदीप कोकाटे, यावेळी श्री शहीद भगतसिंग गणेश मंडळाचे बाळासाहेब कथले,सुमित बलदोटा,गोविंद खंडेलवाल,भाऊसाहेब शिंदे,अशोक फल्ले,यश सुराणा,सोमनाथ जगताप, प्रकाश खामकर,नवनाथ पुरी,ऋषिकेश साखरे,धर्मराज पुरी,मनोज फल्ले,संकेत भोरे यांनी रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी यांनी परिश्रम घेतले.

 
Top