तुळजापूर/ प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील दुभाजक हटवून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रस्ता खुला करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कडे प्रत्यक्ष निवेदन देऊन केली. यावेळी सदरील रस्त्याची तातडीने पाहणी करुन शेतमालसाठी रस्ता करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भारतीय राज्य प्राधिकरण मार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 रस्त्याचे चौपदरीकर काम केले असुन सदर महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे प्रवेशद्वारा समोर रस्ता दुभाजक तयार केल्याने शेतकऱ्यांना शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आणण्यास अडथळा होत आहे. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोरील रस्ता बांधकाम हटवून बाजार समितीत शेतमाल आवकजावक साठी रस्ता खुला करुन देण्याचा मागणी चे निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिलाध्यक्ष रविंद्र इंगळे , उपाध्यक्ष धनाजी पेंदे, शांताराम पेंदे संजय भोसले अभिषेक कोरे यांनी दिले आहे.