तुळजापूर/ प्रतिनिधी
हाडाच मणी आणि रक्ताचं पाणी करून वर्षभर शेतात काबाडकष्ट करून बळीराजाला साथ देणा-या बैलांचे पूजन करण्यात येणारा ‘बैलपोळा’ सण यंदाचं जगावरती आलेलं कोरोनाच सावट आणि  महासंकटामुळे सर्वञ बैलपोळा हा आनंदाचा सण  साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील अनेक  शेतक‍-यांनी  प्रतिवर्षाप्रमाणे जल्लोषात साज-या होणा-या पध्दतींना फाटा देऊन सध्य परिस्थिती चा विचार करून अगदी  साध्या पध्दतीने हा सण साजरा केला.
यावेळी प्रत्येक शेतकर्‍यांनी शेतात व घरासमोर आपल्या लाडक्या सर्जा-राजाची पारंपारिक पध्दतीने विधिवत पूजा केली. यावेळी सामाजिक अंतराचे पालन शेतक-यांनी केले होते. तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी मोठ्या थाटात पार पडणारा हा सण  अत्यंत साधारण पद्धतीने पार पाडून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 
Top