उस्मानाबाद  /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 155 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 66 जणांना रॅपिड टेस्टद्वारे कोरोना ची लागण झाल्याचे दिसून आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील वीस जणांचा मृत्यू झाल्याचेही आढळून आले आहे. यापैकी 12 जणांचा मृत्यू जिल्ह्याच्या बाहेर उपचार घेताना झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शतका जवळ गेला आहे.
सध्या जिल्हयात एकुण रूग्ण ३०४८ झाले आहेत यामध्ये २ रूग्णांचे स्वॅब डबल प्राप्त झाले आहेत.  तर बरे होऊन घरी गेलेले रूग्ण १५५० आहेत. जिल्हयात आता एकुण  १५०४ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत जिल्हयात एकुण ९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे. 




 
Top