उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामधील सर्व कोविड केअर सेंटर (CCC), DCHC, DCH येथे कोविड-19 च्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थाचे तपासणीसाठी खालीलप्रमाणे भरारी पथकाची स्थापना केली आहे.
भरारी पथकाचे समन्वय अधिकारी यांचे नाव व पदनाम, भरारी पथकात नियुक्त केलेले अधिकारी यांचे नाव व पदनाम पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. एन. आर. सरकाटे, सहाय्यक आयुक्त, अन्न, उस्मानाबाद मो.7588649296, श्री. ए. बी. कांबळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उस्मानाबाद मो. 7387225248, श्री. जे. जी. राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तेर ता. उस्मानाबाद मो. 8408090583, श्रीमती व्ही. व्ही. सांगळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, कळंब मो. 8421216106, श्री.एस. यु. मुंढे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वाशी मो. 9422497994, श्री. ए. टी. चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी, भूम मो. 9922334654, श्री. एन. डी. गायके, बाल विकास प्रकल्प अधिकारी, परंडा मो. 9665782879, श्री. एस. डी. हावळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तुळजापूर मो. 9767557167,  श्रीमती एम. एस. जमादार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, लोहारा. मो. 9763975832, श्री. डी. के. वाघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उमरगा. मो. 9764597030, श्रीमती  एस. एम. जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुरुम. मो.9766821174 यांची नियुक्त भरारी पथकामध्ये केलेली आहे. या नियुक्त भरारी पथकांनी खालील प्रमाणे कामकाज करावे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व CCC, DCHC, DCH ला अचानक भेट देणे व तेथे दाखल असलेले कोविड-19 चे रुग्ण,विलगीकरणातील व्यक्ती यांना दररोज वेळेवर शासन नियमानुसार निश्चित केल्याप्रमाणे जेवण देण्यात येते किंवा कसे याबाबत तपासणी करणे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व CCC, DCHC, DCH रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा, गुणवत्ता, भेसळ, स्वच्छता, साफसफाई या अनुषंगाने तपासणी करणे व आढळून आलेल्या त्रुटी संबंधित Incident Commander  तथा तहसीलदार यांचे निदर्शनास आणून देणे.
वरीलप्रमाणे कार्यवाही करुन नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास अहवाल सादर करणे.
 या आदेशाचे उल्लंघन करणारी  व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

 
Top