उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महामारी स्वरूप असलेल्या व संपूर्ण जगाला संकटात लोटणाऱ्या कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी केंद्र सरकार तथा महाराष्ट्र शासनाने घालुन दिलेल्या नियमाचे पालन करत असताना संपुर्ण तीर्थक्षेत्राच्या यात्रा-जत्रा तथा दरमहा भरणाऱ्या विविध धर्मस्थळावरील वारीचे कार्यक्रम तसेच सणवाराचे संपुर्ण कार्यक्रम बंद ठेवण्याची शिस्त संपुर्ण वारकरी संप्रदायाने पाळलेली आहे. तसेच देशभरातील सर्वधर्म पंथाचे लोकांनी आज तागायत शिस्त पाळलेली आहे. आता त्याला जवळ-जवळ सहा महिने होत आहेत. परंतु सद्या सर्वच भावीक भक्तांचे मनात अस्वस्थता तथा बेचैनी वाढलेली आहे. इतर व्यवहार चालु आहेत. लग्न, किरकोळ व्यापार इत्यादि चालु असताना मंदीर का बंद आहेत. असा प्रश्न शेकडो लोक विचारत आहेत. अशा परिस्थितित महाराष्ट्राचे जेष्ठ नेते श्री चंद्रकांत दादाजी पाटील  यांचे अध्यक्षतेखाली व श्री तुषारजी भोसले साहेब नाशिक यांच्या संयोजनाने महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानचे प्रमुख अथवा प्रतिनिधीची आणि विविध धर्म पंथाचे प्रतिनिधी अथवा प्रमुख आणि महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधी यांची झुम अॅपवर बैठक घेण्यात आली .
बैँठकीमध्ये शिर्डी देवस्थानचे  अध्यक्ष आवरे  , विठ्ठल रुक्मीणी देवस्थानचे श्री अतुलजी भोसले  त्याचप्रमाणे पुरोहित संघाचे प्रमुख आणि ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ,  स्वतः, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंजाळ आणि जैन, शिख, महानुभाव इत्यादि धर्म पंथाचे प्रमुख तथा प्रतिनिधिची झुम अॅपवर बैठक होऊन सध्या कोरोनाचे रोगी वाढत आहेत. अशा वेळी आंदोलनाची गर्दी एका ठिकाणी वाढवण्यापेक्षा प्रत्येकांनी आपआपले गावचे मंदीरात शनिवार दिनांक २९ रोजी कोणत्याही पक्षाचे अथवा धर्म पंथाचे नावाने आंदोलन न करता दार उघडा उद्धवजी दार उघडा अशी भूमीका किंवा अशा प्रकारचा विचार जेष्ठ नेते चंद्रकांतजी दादा पाटील यांनी सांगितला. त्या निर्णयास अनुसरून अखिल भारतीय वारकरी मंडळ पक्ष व धर्म पंथ विरहीत कोणतेही नेतृत्व न घेता केवळ धार्मीक लोकांच्या भावना महाराष्ट्र शासनास कळवण्यासाठी ज्यांनी त्यांनी आपआपले धर्म पंथाचे प्रार्थना स्थळात वरील तारखेस व वरील वेळेस
आंदोलन करण्याविषयी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी मंडळाचे केंद्रीय कमिटी सदस्य ह.भ.प शंकर महाराज शेवाळे ता. आंबेगाव यांचेशी संपर्क करून मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके व राज्यस्तरीय कार्यकारिनी पदाधिकारी आणि विभागीय अध्यक्ष पुढील प्रमाणे ह.भ.प. भूषण महाराज शिंगरवाडे, पंकज महाराज पवार, ह.भ.प. सोपान महाराज काळपांडे, उमेश महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज माळी, नवनाथ महाराज आंधळे, आनंद महाराज तांबे, धनंजय महाराज गायकर, माऊली महाराज गोरे, आण्णा महाराज बोधले इत्यादि अनेक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून वरील पद्धतीने भाद्रपद शुद्ध एकादशी शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आपआपले गावचे मंदीरात गर्दी न करता तोंडाला मास्क बांधुन, दोन मीटरचे अंतर एकमेकात ठेवुन आंदोलन करून सांप्रदायाची शिस्त व मर्यादेचे दर्शन घडवून शासनाला भाविकांची भावना कळवयाच्या आहेत. 

 
Top