कळंब / प्रतिनिधी -
कळंब तालुक्यातील कार्यरत आदर्श शिक्षिका ज्योती माकोडे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. त्या नवीन पेन्शन  योजनेत येत असल्यामुळे त्यांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही. याची जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कळंब च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी जमा केलेला सव्वा लाख रुपयाचा निधी त्यांच्या मुलीच्या नावे एफ. डी. करण्यात आला होता.
    त्या प्रमाणपत्राचे वितरण आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते त्यांच्या  कुटुंबाकडे  सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील यांच्याकडे संघटनेने सानुग्रह अनुदानाची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली. यावेळी आमदार पाटील यांनी दहा लाख सानुग्रह अनुदानाची क्लिष्ट प्रक्रिया असून ती जिल्हास्तरावर निकाली काढण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे ठाम आश्‍वासन संघटनेला दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हा मुख्य संघटक प्रशांत घुटे, तालुकाध्यक्ष नारायण बाकले, तालुका सल्लागार यू. सी. शिंदे,कार्याध्यक्ष सुनील बोरकर, कोषाध्यक्ष दशरथ नथाडे, संघटक महादेव मेनकुदळे, अविनाश पवार ,अनिल शिंदे, दत्तात्रय जाधवर, प्रमोद लामतुरे, आप्पासाहेब गोरे, विशाल संगवे,ज्येष्ठ शिक्षक अनिल बोरकर, संजय गरड,बळीराम काळे, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, शिवसेनेचे कळंब शहराध्यक्ष प्रदीप बप्पा मेटे  आदीजण उपस्थित होते.

 
Top