उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघाच्या प्रदेश संघटक पदी उस्मानाबादचे प्रमोद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक. 7  रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज (सर्वभाषिक) महासंघाच्या झूम अॅप द्वारा झालेल्या बैठकीत महासंघाचे  संस्थापक अध्यक्ष. श्री डी डी. सोनटक्के साहेब कार्याध्यक्ष अनिल भाऊ शिंदे, मुख्य महासचिव. जयराम वाघ,कोषाध्यक्ष. संजय कनोजिया महिला प्रदेश अध्यक्षा, अरुणाताई रायपुरे, प्रसिद्धीप्रमुख. मनोज मस्के व   उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष. जयराम चव्हाण.यांच्या सह महासंघाच्या सर्व जेष्ठ मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी श्री प्रमोद चव्हाण यांची निवड करून नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top