उस्मानाबाद/प्रतिनिधी : -
तांबेवाडी येथे पडलेल्या दरोड्याचा एलसीबीने उलगडा केला असून, यातील एका आरोपीस अटक करत गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
राजु बाबासाहेब मस्तुद (रा. तांबेवाडी शिवार, ता. भुम) यांच्यासह बाळासाहेब भागुजी कांबळे हे दोघे १६ रोजी मध्यरात्री तांबेवाडी येथील राजु मस्तुद यांच्या शेतात होते. यावेळी रमेश चव्हाण, नागेश काळे, बिभीषण नाना काळे, तोब्या पारधी, बापु चव्हाण (सर्व रा. पारधी पिढी, ढोकी), आप्पा सोपान काळे उर्फ मामा, कल्याण दत्ता काळे (दोघे रा. कोरेगांव, ता. भुम) व दीपक अर्जुन माळी (रा. तेर)या आठ जणांनी राजु मस्तुद व बाळासाहेब कांबळे यांना लोखंडी गज, हॉकी स्टीकने मारहाण करून राजु मस्तुद यांच्या ४५ शेळ्या- बोकड- पिल्ले तसेच घरातील रोख ८९,६०० रुपयांसह दागिने व मोबाईल फोन असा एकुण ६ लाख २ हजार ६०० रुपयांचा ऐवज नेला होता.