उस्मानाबाद/प्रतिनिधी : -
तालुक्यातील देवळाली येथील डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सोमवारी (दि.१७) अप्पर मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी सदरील नियुक्तीचे आदेश काढले. डॉ. राजेश देशमुख यंानी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आहे.
यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी असताना त्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविले. कीटकनाशक फवारणीमध्ये शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर त्यांनी कीटच्या माध्यमातून फवारणी करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच दुष्काळमुक्तीसाठी पाणी टंचाई, शेतकरी आत्महत्या, पीककर्ज आदी मुद्द्यांवर त्यांनी विशेष काम केले. सध्या ते हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाचे (मंुबई) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निवडीबद्दल मूळ गावी अभिनंदन होत आहे.
 
Top