उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा आज   सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून केल्याने जिल्ह्यात  खळबळ उडाली आहे.
 विधानसभा निवडणुकीच्या वेळी  शिवसेना उमेदवार कैलास  पाटील यांच्या प्रचारार्थ  जाहीर सभेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर  पाडोळी ( नायगाव ) येथे गेले असता, दि. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी याच गावातील  अजिंक्य टेकाळे  याने चाकूने खुनी हल्ला केला होता, पण ओमराजे बालंबाल बचावले होते. त्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे यास पोलिसांनी अटक करून जेल मध्ये रवानगी केली होती, गेल्या दहा महिन्यापासून तो जेलची तो हवा खात आहे.
कोरोना संसर्गमुळे तांबरी विभागात तात्पुरते कारगृह  करण्यात आले आहे. त्यात आरोपी टेकाळे  यास ठेवण्यात आले आहे. त्यास आज वैद्यकीय  तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातून तात्पुरत्या जेल मध्ये आल्यानंतर जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला आहे. ही  माहिती मिळताच, पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.पोलिसांना हिसका देऊन आरोपी पळाल्याचे  त्यांचे  म्हणणे आहे.

 
Top