तुळजापूर/ प्रतिनिधी
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरामध्ये कोरोना काळात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहेत. याकडे लक्ष देऊन सुरू असलेले अवैध धंदे बंद करून कारवाई करण्याची मागणी भष्ट्राचार निर्मुलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन करण्यात आली.
तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना महामारी काळात गुटखा विक्री सह अवैध धंदे खुलेआम जोरात चालू आहेत. यापुर्वी या प्रकरणी चार निवेदन देवुन ही त्यावर कारवाई नाही विशेष म्हणजे कोरोना काळात इतर वेळी पेक्षा अवैधरित्या गुटखा विक्री चालु असुन याकडे प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष आह. यात पोलिस प्रशासन व अन्न भेसळ प्रतिबंध खात्याचा निष्किळजीपणा दिसुन येत आहे. या बाबतीत अनेक वेळा निवेदन देवुन ही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, हा दुर्लक्षितपणा नागरिकांचा जीवाशी खेळण्यासारखा आहे, तरी अवैध धंद्या विरोधात कडक निरपेक्ष कारवाई करावी. अन्यथा आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे विजय रावण भोसले यांनी दिला आहे.