उस्मानाबाद / प्रतिनीधी
सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद युवा मंडळाने एक नवीन आदर्श जनमाणसांत उभा केला आहे. गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रम घेत आहे. मुख्य म्हणजे मंडळाच्या सामाजिक कार्याची किर्ती ऐकून विविध समाज माध्यमांद्वारे आता मदतीचे हात देखील पुढे येत आहेत.
सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवामध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव रद्द करून विविध सामाजिक उपक्रम घेण्याचा ध्यास पूर्व जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष केला व त्याला सुरुवात देखील झाली.
सामाजिक उपक्रमांमधील पहिला कार्यक्रम हा ‘रक्तदान शिबीर’ झाला. विवेकानंद युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र व दिशा कंम्प्युटर इंस्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.
मंडळाचे कार्यकर्त्यांचे पूर्णपणे व्यवस्थित नियोजन, नेहरू युवा केंद्राची शासन मदत व दिशा कंम्प्युटरचे अमूल्य योगदान यामुळे कार्यक्रमाची स्तुती शहराभरामध्ये सुरू आहे. शिबीरामध्ये एकूण ५२ युवा रक्तदात्यांनी रक्तदान केले.  रक्तदान करणार्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तीन प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार देखील केला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खासदार मा.श्री. ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सिव्हील सर्जन डॉ.बालाजी समुद्रे, समर्थ सिटी अँड डेव्हलर्सचे संचालक सचिनजी शिंदे यांची लाभली.
यावेळी खासदारांनी विवेकानंद युवा मंडळाच्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेऊन “पुढील इतरही कार्यात प्रशासन तुमच्या सोबत आहे.व तुमच्या या कार्याची दखल प्रशासन नक्की घेईल” असे सांगितले.
कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे रोहन गाढवे, दिशा कंम्प्युटर इंस्टिट्यूटचे प्रा.क्रांतिसिंह काकडे, विवेकानंद युवा मंडळ परिवारचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, समन्वयक स्वप्नील देशमुख, सहसचिव महेंद्र जाधव, प्रसिद्धीप्रमुख ओमकार शिंदे, सदस्य शुभम माने, समर्थ शिरसीकर, शुभम मगर, प्रतिक जंगमे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top