उस्मानाबाद / प्रतिनिधी
 तालुक्यातील येडशी येथील खडी केंद्रावर उभे केलेल्या डंपरची चार चाके चोरट्यांनी लंपास केली होती. स्थानिक गुन्हे शाखेने चाके चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चार चाकेही जप्त करण्यात आली आहेत.
चार दिवसातच या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. येडशी येथे खडी क्रशर केंद्रावर उभे असलेल्या डंपरची (एमएच ०४ बीजी ६८६९) चार चाके व एक्सकॅव्हेटर यंत्राच्या (एमएच १६ एफ ६३४५) इंधन टाकीतील ११५ ‍लिटर डिझेल गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरले होते. यावरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने चोरीचा छडा लावला.
 
Top