उस्मानाबाद/प्रतिनिधी : -
चोराखळी (ता. कळंब) येथील धाराशिव साखर कारखान्याने (युनिट क्रं.१) गेल्यावर्षीच्या २०१९-२० गळीत हंगामातील ऊस घातलेल्या सभासद शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर २०० रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केली असून,पहिला हप्ता म्हणून यापूर्वी कारखान्याने २१०० रूपये प्रतिटन रक्कम शेतकऱ्यांना दिली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२०१९-२० ऊस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जास्त दर देणार असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घोषित केले होते. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना या निर्णयामुळे आर्थिक आधार मिळणार आहे. पोळा, लक्ष्मी, गणपती सणासाठी तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मदत व्हावी, अशी कारखान्याची अपेक्षा असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, कारखाना नेहमी कर्मचारी आणि शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेत असून सर्वांच्या सुख दुःखात डीव्हीपी उद्योग समूह सहभागी असतो. शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात दुसऱ्या हप्त्याची रक्कम धनादेशाद्वारे घरपोच मिळेल. २०१८- १९ मध्ये कारखान्याने एफआरपी पेक्षा जास्त दर देऊन मागील १०० रूपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत.
 
Top