उस्मानाबाद/ प्रतिनिधी-जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग अधिक वेगाने वाढत असून शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 174 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजपर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या हजारीपार 1464 वर पोहचली आहे. उस्मानाबाद आणि उमरग्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. तर गेल्या पाच दिवसांपासून दररोज शंभराहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने संसर्ग आटोक्यात आणण्याकरिता केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 2 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1464 वर पोहचली असून 516 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर 891 जणांवर उचार सुरू असून 59 जणांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या 513 स्वॅबचे अहवाल गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यातील तब्बल 174 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अहवालामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात सर्वाधिक 54, उमरगा 66, तुळजापूर 44, कळंब 03, वाशी 01, परंडा 06 तर लोहारा तालुक्यात 03 रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात संसर्गाचा वेग अधिकच वाढला असून तुळजापूर तालुक्यातही हे प्रमाण वाढत आहे. उस्मानाबाद शहरातील बहुतांश भागात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित आढळून येत आहेत. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात
उस्मानाबाद शहरात
जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालयासह ओमनगर, आडत लाईन, पॉलिटेक्निक विद्यालय, शंकर नगर, शिवाजीनगर, सावरकर चौक, विद्यानगर, ज्ञानेश्वर नगर, शिक्षक कॉलनी, उंबरे कोठा, नाईकवाडी नगर, पारिजातक अपार्टमेंट, दत्त नगर, देवकते गल्ली, दर्गा रोड, धारासूरमर्दिनी मंदिर परिसर, जिल्हा कारागृह, आनंदगर आदी भागात रुग्ण आढळलेत.
उस्मानाबाद तालुक्यात
बेंबळी, रुईभर, सारोळा, तेर, म्हाळंगी, येडशी, गोरेवाडी, जुनोनी आदी गावात रुग्ण आढळून आले आहेत.
उमरगा शहरात
जुनी पेठ, महादेव गल्ली, अजयनगर, इंदिरा चौक, भीमनगर, बेडदुर्गे हॉस्पिटल, संगमेश्वर नर्सिंग होम, सदननगर, प्रतिभानगर, चालुक्य कॉलनी, बालाजीनगर, काळे प्लॉट, कुंभारपाटी सह
उमरगा तालुक्यात
एकोंडी, गुंजोटी, तुरोरी, जकेकूर, दुधनाळ, दापका आदी गावात मिळून 63 नवे रुग्ण आढळले आहेत.
तुळजापूर शहरात
हडको, पुष्पविहार, पुजारीनगर, कणे गल्लीसह तालुक्यातील पांगरधरवाडी, अणदूर, देवसिंगा, नळदुर्ग आदी गावांमध्ये कोरोना बाधित आढळले आहेत.
तसेच कळंब, परंडा, वाशी, लोहारा तालुक्यातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.