उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात रोज वाढत जाणार्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी रविवारी (दि.2) काढलेल्या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढत जाणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरीकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरीकांनी चेहरा झाकणे, तोंडावर मास्क, रुमालाचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, आस्थापना, दुकाने यांनी एका वेळी पांच पेक्षा अधिक व्यक्ती दुकानात, आस्थापनेत उपस्थित रहाणार नाहीत, ग्राहकांत अंतर राहील. याबाबत दक्षता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक मेळावे, समारंभाला निर्बंध घालण्यात आले आहे. विवाह समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाकारली आहे. अंत्ययात्रेत, विधीसाठी वीस पेक्षा जास्त जणांना परवानगी नाकारण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू आदी पदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शक्य असेंल तिथे घरातूनच काम करण्याच्या पध्दतीचा अवलंब करावा. सर्व प्रवेश व निर्गमनाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, हॅन्डवॉश व सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच सर्व अत्यावश्यक दुकाने, सेवा नियमित अनुज्ञेय वेळेनुसार सुरु रहाणार आहेत.जिल्हाअंतर्गत बससेवा शारीरीक अंतर ठेवून व निर्जतुंकीकरणाच्या उपाय योजनेसह पंन्नास टक्के आसन क्षमतेने सुरु राहील. आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवे व्यक्तीरीक्त इतर सर्व आस्थापना, बाजारपेठा दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालु रहाणार आहेत. याची अंमलबजावणी पाच ऑगस्ट पासून राहील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस आदी संस्था बंदच रहाणार आहेत. अटी व शर्तीसह केशकर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर सुरु रहाणार आहेत. दुचाकीवर दोघांना तीन चाकी वाहनात तीघांना व चार चाकी वाहनांत चौघांना प्रवासाची मुभा रहाणार आहे.

 
Top