उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरात प्रतिकात्मक श्रीकृष्णास लोणी खाऊ घालून भाजपा महायुतीचे दूध महाएल्गार आंदोलन करण्यात आले. दरम्यान आ.रणाजगजितसिंह पाटील व नितीन काळे यांनी दही घुसळून निघालेले लोणी प्रतिकात्मक श्रीकृष्णास खाऊ घातले व या श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी द्यावी,व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
 महाभारतात उद्धव हे श्रीकृष्णाचे मित्र तत्वज्ञ होते,श्रीकृष्णाने उद्धवास जनतेच्या प्रति त्याग व परिश्रमाचे धडे दिले,त्याग व परिश्रमाचा अभाव लोकप्रतिनिधीच्या ज्ञानाला संकुचित ठेवतो,श्रीकृष्णाने जनहितासाठी उद्धवाना मौलिक मार्गदर्शन केले होते तसेच मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करावे व त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
Top