उस्मानाबाद/प्रतिनिधी
त्रिरत्न बौद्ध महासंघ उस्मानाबाद च्या वतिने वर्षावास कालावधीत दर रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास विविध विषयांवर प्रवचन मालिका आयोजित केली आहे.
रविवारी दि दोन ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथून धम्मचारी सुचिरत्न हे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य या विषयावर प्रवचन देणार आहेत.नऊ ऑगस्ट रोजी पुणे येथून धम्मचारी यशोरत्न हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश या विषयावर प्रवचन देणार आहेत.१६ ऑगस्ट रोजी पुणे येथून धम्मचानी अमोघनेत्री  ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचार धारा आणि महिला सक्षमीकरण यावर प्रवचन देणार आहेत.दि २३ ऑगस्ट रोजी पुणे येथून धम्मचारी यशोसागर हे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म बौद्धांचा पथदर्शक या विषयावर विवेचन करणार आहेत.तर ३० ऑगस्ट रोजी समारोपिय प्रवचन धम्मचारी अनोमदस्सि हे पत्रातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अवलोकन या वर विचार मांडणार आहेत.
या कालावधीत कोविड च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रत्येकाला मानसिक आधार देण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे वतीने  झूम अँप द्वारे ही प्रवचन मालिका आयोजित केली आहे या प्रवचनास सर्वणी उपस्थित रहावे असे आवाहन त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर चे चेअरमन धम्मचारी ज्ञानपलीत, धम्मचारी रत्नपालित, धम्मचारी कल्याणदस्सी,धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी विरतकुमार यांनी केले आहे
 
Top