उस्मानाबाद/ प्रतिनिधीउस्मानाबाद जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेदिंवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दि. 01 ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 450 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 415 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले आहे. त्यामध्ये १२३ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर निगेटीव्ह रिपोर्ट २४१ व इन्क्लुझिव्ह ५१ व प्रलंबित ३५ जणांचे रिपोर्ट आहेत. त्यामुळे जिल्हयात आता एकुण रूग्णसंख्या १२८३ झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रूग्ण ५१६ तर सध्या परिस्थित ७१३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
उमरगा:- 32
तुळजापूर:- 16
कळंब:- 12
वाशी:- 02
परंडा:- 12
उस्मानाबाद :- 44
भूम:- 05