उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस (20 ऑगस्ट) सद्भभावना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त देशाच्या एकात्मतेविषयी सद्भभावना शपथ देण्यात आली.
 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,पाणी स्वच्छता मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता शांती,प्रेम टिकून राहावे आणि वृद्धिंगत व्हावे यासाठी 20 ऑगस्ट 2008 मध्ये सर्वप्रथम राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भभावना दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात आला होता.
 या दिनाचे औचित्य साधून भारतीयांना खास शपथ दिली जाते. देशभरात अनेक कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो. उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील सद्भभावना दिन कार्यक्रमाप्रसंगी  जिल्हा परिषदेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांची उपस्थित होते.
 
Top