उस्मानाबाद / प्रतिनिधी-
संस्कार भारती धाराशिव समितीने  शहरातील स्वामी विवेकानंद केंद्रात कोरोना संसर्ग पार्श्वभूमी लक्षात घेता पर्यावरणपुरक मातीपासून श्रीगणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा छोट्याखानी आयोजित केली होती. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
 कोरोना नियमावलीचे अवलंब करून जंतू नाशक फरवारा समवेत बाळगुन, सामाजिक , देह अंतर , मुखअवरण परिधान करून योग्य ती दक्षता घेऊन एकूण १० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यावेळी सत्य हरी वाघ , प्रतिक्षा जाधव , अलर्क मसलेकर , विशाखा बागल, अर्णव दहिटणकर , गार्गी मसलेकर , हर्षदा बागल , भालचंद्र मसलेकर समिती जिल्हा संघटनमंत्री प्रभाकर चोराखळीकर समिती जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ यांनी कार्यशाळेस गणेशमुर्ती तयार करून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस उपस्थित पदाधिकारी महामंत्री सुधीर कुलकर्णी , केंद्र प्रमुख प्रा. श्यामराव दहिटणकर उपजिल्हाप्रमुख अनिल ढगे, जिल्हा नाट्यविधाप्रमुख धनंजय कुलकर्णी ,भारत मसलेकर सौ. सुनिता दहिटणकर, सौं. प्रगती बागल पालक उपस्थित होते.

 
Top