तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यात सलग  तीन  दिवसा पासुन मोठ्या संखेने कोरोना बाधीत रुग्ण सापडत असल्याने सर्वञ घबराहटीचे वातावरण पसरले आहे..शनिवारी  तहसिल कार्यालयातील तहसिलदार , नायब तहसिलदार,  तीन लिपीक अशा पाच जणांचा अहवाल कोरोना पाँजिटीव्ह आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली
शनिवारी तुळजापूर तालुक्यातील  16 जणांचे अहवाल कोरोना पाँजिटीव्ह आला.त्यातष तुळजापूर सात नळदुर्ग सहा अणदूर येथील तीन जणांचा समावेश आहे. गुरुवारी तहसिल कार्यालायातील एक लिपीक कर्मचारी कोरोना बाधीत निघाला होता त्याचा संपर्कातील नऊ लोकांचे स्वँब घेतले होते. त्यापैकी पाच जणांचे पाँजिटीव्ह आले आहे.यांच्या संपर्कातील मंडळी माञ घाबरुन गेले आहे. शनिवारी शहरात जनता कर्फ्यु स शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला.
शहरातील क्वारटांईन सेंन्टर सध्या भरुन गेले आहे. तहसिल कार्यालयातील कर्मचारी पाँजिटीव्ह सापडल्याने इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी माञ घाबरून गेले आहेत.

 
Top