उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 वडगाव (सि) परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर व ट्रक मध्ये ही जोराची टक्कर झाली असून त्यांनी इतरही वाहनांना धडक दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन्ही चालकांमध्ये तुळजापूर पासुन पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरु होती. याच ईर्षेमुळे हा मोठा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.
वडगाव येथील मोरे नर्सरी जवळ थांबलेल्या गाड्यांना या दोन्ही मोठ्या वाहनाने धडक दिली आहे. त्यामुळे या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. तर अपघातात दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये  GJ १६ AU ७७०० ही गाडी वेगात आली. ती आयशरला धडकली. त्या बाजुला उभारलेल्या अजून एका वाहनाला टक्कर दिली. यामध्ये एक जण अडकून पडला होता. दोन चालकांच्या ईर्षेमुळं अनेक वाहनाच्या नुकसान झाले शिवाय अनेकांच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला होता.तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चार वाहनांचे नुकसान 
टँकर व ट्रक मध्ये ही जोराची टक्कर झाली. त्यामुळे या वाहनांचे नुकसान झाले. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या अन्य चार वाहनांचे देखील नुकसान झाले. यामध्ये आयसर, बोलेरो, छोटा हत्ती आदी वाहनांचा समावेश आहे.

 
Top