उस्मानाबाद /प्रतिनिधी- वाशी तालुक्यातील तेरखेडा, कडकनाथवाडी, मसोबाचीवाडी, नांदगाव, गोलेगाव येथे दि 06 ऑगस्ट रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गावास उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांन समवेत भेट देऊन गावातील सद्य स्थितीचा आढावा घेतला.गावातील नागरिकांशी चर्चा करून गावातील प्रत्येक कुटुंबांना आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस देण्यात आल्या. दिवसेंनदिवस गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन काकासाहेब पाटील, जि.प.सदस्य उद्धव साळवी, तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, विभागप्रमुख श्रीराम घुले, शाखाप्रमुख संदिप घुले, वैभव पाटील, शरद मनगिरे,सचिन कात्रे बब्रुवान कात्रे, तहसीलदार संदिप राजपुरे, गटविकास अधिकारी खिल्लारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकर, सचिन घुले, ग्रा.पं.सदस्य रणजित घुले, वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, कोरोना कक्ष शिक्षक, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.