उमरगा/ प्रतिनिधी : -
 जगभर कोरोनाचे सावट आहे, सर्वत्र नागरिकांचा संपर्क वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी रुग्णसेवा करणे हे डॉक्टरांसमोर आवाहन असताना स्वतः सोबत कुटुंबाची काळजी घेत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सचा रोटरी क्लब च्यावतीने गौरव करण्यात आला.
तालुका रोटरी क्लब समाजातील सर्व घटकांचा सेवा भाव,सामाजिक बांधिलकीतून सातत्याने गौरवण्यात येते. बुधवारी (२६) उपजिल्हा रुग्णालयात मागील पाच महिन्यापासून बाधित रुग्णांची सेवा करत एक आदर्श निर्माण केला असल्याने अशा डॉक्टर्सचा सन्मान करणे हे कर्तव्य समजून रोटरी क्लब यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथून नुकतेच बदलून परभणी येथे गेलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडित पुरी, नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ बडे अशोक,उपजिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाचे समन्वयक डॉ विक्रम आळंगेकर, मुरूमच्या ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे यांचा  उपजिल्हा रुग्णालय येथे गौरवण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. वसंत बाबरे म्हणाले, वैद्यकीय सेवेत रुग्णाची सेवा करणे हे डॉक्टर चे कर्तव्य आहे, पण अशा आवाहनात्मक कार्यास डॉक्टर तत्परतेने उभे राहण्यास कायम सेवे त तयार आहोत. कार्याची दखल घेत रोटरी क्लबने आमचा सन्मान केला हे स्तुत्य कार्य आहे.   सचिव अनिल मदनसुरे, माजी अध्यक्ष डॉ. विनोद देवरकर,  जिपचे माजी सदस्य दिलीप भालेराव, वैजिनाथ पवार, राजू थोरात उपस्थित होते.

 
Top