तेर/ प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूचा अमृततुल्य परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस .एस. बळवंतराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, एन आय एस कुस्ती कोच गोविंद घारगे , सुर्यकांत नाईकवाडी , दत्ता मगर , पै.शामराव गायके , लहू माने , संजय जाधव , संयोजक बालाजी बनकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अमृततुल्य परीवाराच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विराज विजयकुमार जाधवर , रोहीत मारुती एकीले , रोहीत महेश काळे , ओंकार बबन नाईकवाडी , आदित्य काळे , राधा गोरोबा गोरे , निकिता महेंद्र घोगरे , अपेक्षा गोरख माळी , प्रणिता विजयकुमार जाधवर , नंदिनी रणजितसिंह राजपूत , वैष्णवी युवराज इंगळे , प्रतिक्षा रामलिंग केसकर , प्रतिक्षा संतोष पिंपळे आदि खेळाडूंसह क्रिडा मार्गदर्शक हरी खोटे यांचा शाल फेटा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश गोडगे यांनी केले.