उस्मानाबाद/प्रतिनिधी : -
जिल्ह्यातील कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे अनुषंगाने जिल्हा शासकीय रुग्णालय (District Covid Hospital-DCH) मधील कोविड-19 च्या उपाययोजनांचे पर्यवेक्षण व समन्वय करण्यासाठी  नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जिल्हा कोविड रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा  दिपा मुधोळ-मुंडे  यांनी डॉ. श्री. आर. बी. जोशी (मो. 9890402578), प्रकल्प व्यवस्थापक, स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूर ता. लोहारा यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
वरीलप्रमाणे नियुक्त पर्यवेक्षण अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.
जिल्हा कोविड़ रुग्णालय (District Covid Hospital - DCH) येथे कोविड-19 चे अनुषंगाने देण्यात येत असलेले उपचार व सेवा-सुविधांबाबत पर्यवेक्षण करण्यासाठी नियुक्त केलेले पर्यवेक्षण अधिकारी यांना नेमून देण्यात आलेल्या कामकाजात सहाय्य करणे.जिल्हा कोविड रुग्णालय (District Covid Hospital - DCH) येथील व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करुन त्याबाबतचे अभिलेख आवश्यक असलेल्या विविध नमुन्यातील रजिस्टर्स मध्ये तयार करणे.जिल्हा कोविड रुग्णालय (District Covid Hospital - DCH) येथील व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत लेखी अहवाल सादर करणे व त्यानुसार सुधारणा करणे.जिल्हाधिकारी उस्मानाबाद तसेच जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील कामकाजासाठी नियुक्त केलेले नियंत्रण अधिकारी यांनी तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.
वरीलप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा नियंत्रण व समन्वय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांना व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करणे. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
 
Top