उस्मानाबाद दि.२९ (प्रतिनिधी) - जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज आलेल्या रिपोर्टमध्ये १४५ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी बाहेर जिल्ह्यात १३, रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे ८४ व  आरटीपीसीआरमध्ये ४८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ३३०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज ७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.९६ टक्के झाले असून  जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर २.५९ टक्के असून आजपर्यंत ३४ हजार ५५७ जणांच्या तपासण्या प्रयोग शाळेत करण्यात आल्या असून त्यापैकी पाच हजार ३२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.  पॉझिटीव्हचे प्रमाण १५.४२ टक्के आहे तर सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच हजार ७६१ व्यक्ती होम क्वॉरन्टाईनमध्ये असून ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वॉरन्टाईनमध्ये उपचार घेत आहेत.
आज आलेल्या पॉझिटिव रिपोर्टमध्ये   (जिल्ह्यातील परंतू बाहेर जिल्ह्यात असलेले) व एकूण संख्या पुढीलप्रमाणे-  उस्मानाबाद - ३ , तुळजापूर - ९  , उमरगा - २४ कळंब-१२, तर ॲन्टीजन टेस्टमध्ये उस्मानाबाद - ५० (७) ६० , तुळजापूर - १ (१) ११, उमरगा - ४ (१) २९, कळंब - १ (०) १३, परंडा - ८ (१) ९, लोहारा - ५ (१) ६, भूम - ८ (१) ९ व वाशी - ७ (१) ८ असे एकूण १४५ नवीन रुग्णांची भर पडली आहे.
 
Top