उस्मानाबाद / प्रतिनिधी-
हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज ११३ जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. विशेषत: बर्लिन ऑलंपिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिमफेरीत ८-१ अशी धूळ चारली होती.हा सामना पाहत असताना जर्मनीचा हुकुमशहा ज्यांने क्रुरपणे ज्यु लोकांची कत्तल सहपणे केली असा हा आदल्या हिटलर  या हॉकीचा जादुगर मेजर ध्यानचंदच्या खेळाच्या प्रेमात पडला होता व ध्यानचंद यांचा खेळ पाहुन जर्मनी देशाकडुन खेळायाची अॉफर या भारतीय खेळाडुला देण्याचा मोह हा हुकुमशहा आवरु शकला नव्हता हवी ती  नौकरी सैन्यात  देण्याची अॉफर त्याकाळी या भारतीय खेळाडुला हुकुकमशहा हिटलने दिलेली होतीपरंतु या गुणी खेळाडूने ती  ऑफर नाकारून देश्प्रेमाला प्राधान्य दिले होते या विजयासह सलग तीन ऑलंपिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली होती.मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये ४०० पेक्षा जास्त गोल करत आपण ‘गोल मशीन’ मशीन असल्याचे सिद्ध केले होते.
  या अशा महान आंतराराष्ट्रीय  खेळाडूच्या समरणार्थ आजच्या दिवशी भारतामध्ये राष्र्टीय क्रीडा दिन साजरा केला जातो त्यानिमित्त आज उस्मानाबाद जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशन , श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी  व श्रीराम स्पोर्ट्स अँड गारमेंट यांच्या वतीने  मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन हॉलीबॉल चे राष्ट्रीय प्रशिक्षक संजय दादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी संघटक महाराष्ट्र राज्य सायकलिंग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर ,खो खो चे राष्ट्रीय प्रशिक्षक बिभीषण पाटील , अॅथलेटिक्स कोच मोहन पाटील , क्रीडा प्रबोधिनीचे सचिव कुलदीप सावंत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजेश भवाळ,रवी मोहिते,जिल्हा ऍथलेटिकस संघटनेचे सहसचिव तथा अॅथलेटिक्स कोच योगेश थोरबोले, अॅथलेटिक्स कोच अजिंक्य वराळे,क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, TFC फिटनेस क्लब चे संचालक राम भुतेकर यांचा व  राज्य/राष्ट्रीय खेळाडू कु  निर्भय देशमुख ,कु योगिनी साळुंके, विश्वजित कुलकर्णी , रितेश धोत्रे ,प्रशांत धोत्रे, प्रकाश घायाळ व प्रशिक्षक ऋषिकेश पाटील, आशुतोष माने,  अविनाश थोरबोले,विकास लोभे ,  यांचा शाल श्रीफळ व  पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा ऍथलेटिकस संघटनेचे सहसचिव तथा अॅथलेटिक्स कोच योगेश थोरबोले यांनी तर आभार अजिंक्य वराळे यांनी केले.

 
Top