उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 केंद्र शासन हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसलेल्या जेईई व नीटची परीक्षा घेण्याबाबत अाग्रही असून ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी उस्मानाबादेत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटात सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत झालेली नाही. तरीही केंद्र सरकार अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा (जेईई आणि नीट) सप्टेंबरमध्ये घेण्यावर अडून आहे. विद्यार्थी व त्यायंच्या कुटुंबीयांसाठी हे धोकादायक आहे. विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. तरी केंद्र सरकारने आपला निर्णय पुढे ढकलावा, कोरोना आटोक्यात आल्यावर परीक्षी घ्यावी,अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनेही यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रकाश आष्टे, उमेश राजेनिंबाळकर, खलील सय्यद, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, अॅड. राहुल लोखंडे, जावेद काझी, सुरेंद्र पाटील, सिद्धार्थ बनसोडे आदींचा सहभाग होता.
 
Top