तुळजापूर/प्रतिनिधी-
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने विद्यापीठाच्या परीक्षा घेऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे संकट गडद होत असतानाही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने संभ्रम निर्माण झाला. कोरोनाच्या संकटात परीक्षा घेतल्यास लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, सरचिटणीस विशाल पाटील, सौरभ देशमुख, विकी घुगे, सूरज शेरकर आदी उपस्थित होते.
 
Top