तेर /प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सहाव्या शतकातील कालेश्वर मंदीराच्या कमकुवत झालेल्या   अंतराळपासून भाविकभक्तांच्या जिवितास धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे तेरणा नदीच्या तिरावर 6 व्या शतकातील विटानी बांधलेले शिवशंकाराचे कालेश्वर मंदीर असून मंदीराचे शिखर द्राविडी पद्धतीने बांधलेले आहे.मंदीराची रचना गर्भग्रह,अंतराळ व मंडप अशी आहे.गर्भग्रहाच्या भिंतीची रचना पिरँमिडसारखी असल्यासारखी आहे.परंतू मंदीराच्या अंतराळ भागात पाऊस पडल्यावर मंदीरात  पाणी गळते.अंतराळचावरच्या छताला भेगा पडलेल्या असल्याने अंतराळाचा भाग कमकुवत झाल्याने ते कधी ढासळेल हे सांगता येत नाही. मंदीराचा अंतराळ भाग कधी कोसळेल व अनावधाननाने भाविकांच्या  जिवीतास धोका निर्माण होईल ते सांगता येत नाही.मंदीराला पश्चिमेकडून गर्भग्रहाला मोठी भेगही पडलेली आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन मंदीराचे अंतराळाचा भाग दुरूस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

 
Top