उमरगा / प्रतिनिधी-
गेल्या अनेक दिवसांपासून समाजातील विविध आघाड्यांवर कोरोना  आजाराविरूद्ध लढा सुरू आहे. हा लढा आणखी किती काळ सुरु राहणार याचा अंदाज बांधणे सध्यातारी कठीणच आहे. या लढ्यात अनेक जण प्रत्यक्ष सहभागी होवून युध्दपातळीवर काम करित आहेत. कोरोनाच्या महामारीत आपली भूमिका चोख बजावणारे,पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी नित्यनेमाने आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने हे सर्वजण कोरोना योद्धा आहेत.
जीवाची पर्वा न करता सामान्यांना जीवनदान देणारे आरोग्य विभागात कार्यरत डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे या लढ्यात योगदान मोठे आहे. करोना लढ्यात युध्दपातळीवर काम करणाऱ्याचा तिरंगा हार व पुष्पवृष्टीने सन्मान करण्यात आला.
त्यानंतर शहर स्वच्छतेसाठी व सध्या माणुसकी हरवत चालली असताना कोरोना बाधित मृत्यू झाल्यानंतर अंतिम कार्य करणारे दूताचा फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर देऊन, तिरंगा हार देवून गौरविण्यात आले.
त्यानंतर कोरोनापासून जनतेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेणार्‍या पोलिस  यंत्रणेचा तिरंगा हार घालून सन्मान करण्यात आला.तिन्ही यंत्रणेकडून असे संबोधण्यात आले, जनतेच्या सेवेत आम्ही चोवीस तास उभे आहोत तरी जनतेने ही प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे.  घरात राहून सहकार्य करावे सामान्यता सर्दी, ताप, खोकला असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी नित्यनेमाने आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने हे सर्वजण कोरोना योद्धा आहेत. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असा विश्वास संविधान विचार मंचच्या सदस्यनी यावेळी दिला. या प्रसंगी अध्यक्ष अशोक बनसोडे, प्रा. सुर्यकांत वाघमारे व महादेव पाटील उपस्थित होते.
 
Top