
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ते 27 जुलै या कालावधीत घेण्यात येणाऱ्या निर्धार सप्ताह लोहारा व तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
तिसऱ्या दिवशी लोहारा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कानेगाव येथे जन्म झालेल्या बाळांना ड्रेस व आईला साडी व चोळी वाटप करण्यात आली तसेच जेवळी येथील ग्रामपंचायत येथील महिला कर्मचारी या कोरोना महामारीत आहोरत्र मेहनत घेत आहेत त्यामुळे त्यांचा ही साडी चोळी देउन सन्मान करण्यात आली. पोस्टरबाजी आणि केवळ डिजिट्ल लावून वाढदिवस करणे शिवसेनेचा स्वभाव नाही त्यामुळे हा सामाजीक कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख सतीश कुमार सोमानी, लोहारा तालुका प्रमुख मोहन पनुरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोंभे, युवासेना उपतालुका प्रमुख शिवराज चिनगुंडे, जगदीश लांडगे,दत्ता मोरे, प्रदीप मंडळे, राजेंद्र कदम, अमोल मुळे, मुकेश पाटील, शिवसेना विभाग प्रमुख सौदागर जगताप, मंगेश सोनटक्के उपस्थित होते.