उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 लॉकडाऊनच्या चारही टप्प्यांमध्ये कोरोनाला रोखलेल्या उस्मानाबाद शहरात अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून  बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर जिल्ह्यात एकाच दिवसात 105 बाधितांची नोंद झाली आहे. उस्मानाबाद शहरात कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली असून शहरात एकुण 24 रुग्ण एकाच दिवससात सापडले आहेत, तर तालुक्याची संख्या 38 आहे.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या 387 स्वॅबचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. यात तब्बल 105 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्वाधिक संख्या उमरगा तालुक्यात 47, उस्मानाबाद 38, वाशी 7, तुळजापूर 5, कळंब 5 तर परंडा तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत.
उस्मानाबादेत कापड व्यवसायिक कुटुंबातील ख्वाजानगर मध्ये तब्बल 14 तर महाराष्ट्र बँक परिसरातील 10 जणांना कोरोनाची लागण झालीय. तर आगड गल्ली येथे आणखी 3 तर सांजारोड भागात 1 कोरोनाबाधित आढळून आला आहे. तालुक्यातील येवती येथे 3, येडशी, रुईभर, कौडगाव(बावी) येथेही प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
जिल्ह्यात 29 जुलैच्या दुपारपर्यंत एकुण कोरोनाबाधितांची संख्या 834 वर पोहचली असून 482 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 304 आणि बाहेरील जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद येथे उपचार घेत असलेले 4 अशा एकुण 308 जणांवर उचार सुरू असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
Top