परंडा / प्रतिनिधी-
प्रलंबित फरक देयके माहे ऑगस्ट २०२० च्या नियमित वेतना सोबत काढावित याबाबतचे निवेदन प्रहार शिक्षक संघटने तर्फे दि.२८ मंगळवारी रोजी शिक्षणाधिकारी(प्रा.)रोहिणी कुंभार यांना देण्यात आले.
 जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मान्य आगाऊ वेतनवाढ फरक देयके तसेच वस्तीशाळा निमशिक्षक यांना शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनेनुसार व मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने पारीत केलेल्या आदेशानुसार तसेच जा.क्र.जिपउ/शिक्षण /आस्था-६/कावि-६६०-६७४/२०२० दिनांक १० जून २०२० अन्वये दिनांक १ मार्च २०१४ ते १८ जूलै २०१४ व दिनांक १७ जून ०१६  ते दि.२६ मार्च ०१७ या कालावधीतील वेतन व वेतनवाढीतील फरक देयक
माहे ऑगस्ट २०२० च्या नियमित वेतनासोबत काढून संबंधित शिक्षकांना अदा करावे.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.  यावेळी  प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले,तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे,विजय जरांडे,रमेश शिवणकर आदि.पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते. 
 
Top