उस्मानाबाद / प्रतिनीधी :
 उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उस्मानाबाद येथे सूर्यकांत  पेट्रोल पंपावर ग्राहकांना तसेच पेट्रोल पंप चालक, कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात  जिल्हाध्यक्ष  सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन करण्यात आले .
 या आंदोलनासाठी महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, प्रदेश सरचिटनीस  मसूद शेख , युवक प्रदेश सरचिटनीस प्रशांत कवडे , विद्यार्थी प्रदेश सचिव धीरज घुटे,  युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे, नगरसेवक शेख अय्याज, खलीफा खुरेशी , बाबा मुजावर   यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ एक हि भूल, कमल का फूल ‘, ‘वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा  तेल ‘ अशा घोषणा देत शारीरिक व सामाजिक अंतराचं पालन करत मास्क घालून आलेल्या ग्राहकाला गुलाबाचं फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले .
 शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना , कोरणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सामान्य नागरिक, व्यापारी, सर्व व्यवसायिक आर्थिक संकटात सापडलेला असताना,  केंद्र शासन शेतकरी आणि सामान्य वर्गाची पिळवणूक करत असून आज उस्मानाबाद येथे पेट्रोलचे दर ८७ .५९तर डिझेलचा दर ७८ .०६ एवढ्या मोठ्या उच्चांकी आकड्यावर जाऊन पोचले आहेत . भूलथापा देऊन सत्तेवर आलेले सरकार जनतेला कधी पाकिस्तान तर कधी चीनची भीती घालून पेट्रोल ,डिझेलचे दर वाढवुन जनतेची पिळवणूक करीत आहे . या भाजप सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे मत जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी व्यक्त केले.
 या गांधीगिरी आंदोलनासाठी रोहित बागल, सुरज शेरकर, आशिष पाटील, नंदकुमार गवारे, बबलू शेख, इस्माईल काजी म्हणणं काजी वाजीद पठाण, आतीक शेख,कादरखान पठान, खलील पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .
 
Top