उमरगा / प्रतिनिधी-
औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीचे प्रकाशक, संपादक व पत्रकारांवर प्रशासना ने गुन्हा दाखल केल्याचा निषेध करीत बुधवारी(०१) उमरगा तालुका पत्रकारांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी न्याय मागण्याचे निवेदन देत तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
औरंगाबाद येथे दैनिक दिव्यमराठीवर अन्यायकारक रीत्या गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रशासनाचे वरील विश्वास उडाला आहे. प्रशासनाकडून चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी सुरू असून भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, त्यामुळे घटनाकारानीच आता न्याय द्यावा अशी मागणी करत बुधवारी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी निवेदन अर्पण करण्यात आले. औरंगाबाद येथे प्रशासनाने बातमीचा राग मनात धरून सुडबुध्दीने दैनिक दिव्य मराठीचे प्रकाशक, संपादक व पत्रकारांवर गुन्हा दाखल केल्याचा उमरगा तालुका पत्रकारांच्यावतीने निषेध करीत तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यां चे याकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले आहे. यावेळी पत्रकार अविनाश काळे, नारायण गोस्वामी, गोपाळ अंहकारी, शंकर बिराजदार,प्रा युसुफ मुल्ला, मनीष सोनी, महेश निंबर्गे, अंबादास जाधव, गो ल कांबळे, अमोल पाटील, प्रदिप भोसले, माधवराव सूर्यवंशी यांच्यासह बहुजन विकास संघर्ष समितीचे कमलाकर सूर्यवंशी, चंद्रकांत काळे, मिलिंद कांबळे उपस्थित होते. 
 
Top