तुळजापूर / प्रतिनिधी- 
कोरोनाची जिल्हयात व तालुक्यात परिस्थिती आटोक्यात आहे माञ   सध्या जास्तीत जास्त कंटेनमेंट झोन वाढवुन  व कोरोना बाधीतांचा संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना क्वारटांईन करुन कोरोना रोखावा अशा सुचना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी तुळजापूर येथे श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या भक्त निवास मध्ये असलेल्या क्वारटांईन सेंन्टर मध्ये भेट देताना केली .
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बुधवार दि1रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर ला भेट दिली यावेळी त्यांनी घाटशिळ रोडवर असलेल्या भक्त निवासातील क्वारटांईन सेंन्टर ला भेट देवुन पाहणी केली.
या वेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे विभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे उपजिल्हारुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके डाँ जाधव मुख्याधिकारी अशिष लोकरे   सह विविध खात्याचे अधिकारी उपस्थितीत होते पाहणी केल्यानंतर अधिकारी वर्गास सुचना देताना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर म्हणाले कि सध्या जिल्हयात तालुक्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे तरी ही परिस्थिती हाताचा बाहेर जावू नये यासाठी कंटेनमेंट भाग वाढवा कोरोना बाधीत रुग्णाचा संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना क्वारटांईन करा तुळजापूर येथे चारशे बेड वाढवा व उस्मानाबाद येथे दहा हजार बेड वाढवा लाँकडाऊन ची अमल बजावणी कडक करा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे शक्य आहे ते करा पण परिस्थिती हाताबाहेर जावू देवू नका  यासह अनेक महत्वपुर्ण सुचना केल्या .
 
Top