उमरगा / प्रतिनिधी-
देशात कोरोनाचे संकट असताना पेट्रोल, डिझेलचे वाढविण्यात आले दर कमी करून जनतेला दिलासा देण्याची मागणी बुधवारी (दि ०१) तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे तालुका भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
तहसीलदार संजय पवार यांच्यामार्फत भारतसरकार राष्ट्रपती यांच्याकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त असून यांचे संकटात लाखो कामगारांचे रोजगार हिरावले आहेत शिवाय उद्योग धंदे पुर्व पदावर आले नसताना जनता जगण्यासाठी धडपड करीत असताना पेट्रोल,डिझेल च्या महागाईने दुसरे संकट ओढावले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना जनतेची तारांबळ उडत आहे. सात जूनपासून इंधनाच्या दरात दररोजच वाढ केली जात असून शनिवारपर्यंत पेट्रोल प्रति लिटर ०९.१२ रुपये तर डिझेल अकरा रुपयांची दर वाढ करण्यात आली आहे. देशभरात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर ८७-८८ रुपयांच्या पुढे तर दिल्ली मध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळी वर कच्चे तेल नीचांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असताना सद्या ती पारदर्शकता राहिली नाही. सन २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क ९.४०, डिझेल ०३.५६ रुपये होते. सद्यस्थितीत हेच शुल्क दर ३२. ९८ रुपये व ३१.८३ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्चा तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल, डिझेल याचे दर कमी जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष ॲड सुभाष राजोळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी जिप सदस्य दिलीप भालेराव, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, विजय वाघमारे, अभिषेक औरादे, जीवन सरपे, आदर्श कोथिंबीरे, अनिल सगर विजय दळगडे, महेश माशाळकर, याकुब लदाफ, ॲड एस पी इनामदार आदीच्या सह्या आहेत.
 
Top