उस्मानाबाद / प्रतिनिधी
 सोयाबीनचे निकृष्ट बियाणे पुरविल्याप्रकरणी औरंगाबाद येथील ग्रीनगोल्ड सीड्स प्रा. लि.या कंपनीविरोधात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बियाणे उत्पादक कंपनीचे संचालक संदीप मच्छिंद्र बावीसकर यांनी स्वत:च्या कंपनीच्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा केला.
यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले अशा प्रकारे संबंधीत बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे अशी फिर्याद बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी कळंब विरेश विलास अंधारी यांनी सरकार तर्फे दिली. यावरून सदरील कंपनी व कंपनीचे संचालक संदीप बावीसकर यांच्यावर भादंवि कलम- ४२० सह बी- बियाणे कायदा व बी- बियाणे नियम अन्वये कळंब पोलिस ठाण्यात दि.१२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top