उस्मानाबाद / प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीला गेलेल्या म्हशीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत छडा लाऊन सदरील म्हशीसह दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. भास्कर विश्वंभर टेकाळे (रा. कोल्हेगाव) यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यातील मुऱ्हा जातीची म्हैस दि.९ जुलैच्या मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होती.
याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने आरोपी सुनिल उध्दव चव्हाण (२७ वर्षे, रा. ढोकी) व किशोर शेषेराव पाडोळे (वय ३२ वर्षे, रा. निवळी, ता. लातूर) या दोघांना दि.१२ रोजी ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीची म्हैस व वाहन जप्त केले. ही कारवाई एलसीबीचे पोनि दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.
 
Top