उस्मानाबाद / प्रतिनिधी-
समाजातील गरजू, दुर्लक्षित, उपेक्षित बालक, कौटुंबिक हिंसाचार, गरजू महिला पीडित अत्याचारित महिलांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलपणे काम करावे. विशेषत: उपोषण,  हुंडाबंदी, बालविवाह, परिविक्षाधीन तसेच सखी वन स्टॉप सेंटर मार्फत महिलांना तात्काळ आवश्यक त्या सेवा देण्याच्या सूचना केल्या. COVID-19 या भयंकर रोगाच्या काळात प्रत्येकांनी  सज्जपणे कर्तव्य बजावून महिला व बालकांना वेळेत समुपदेशन करुन मदत व विविध योजनांचा लाभ  मिळवून द्यावा, अशा सूचना  अपर जिल्हाधिकारी रुपाळी आवळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी महिला व बालकांच्या विविध योजना राबवितात. 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके तसेच गरजू व पीडित महिलांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या सर्व योजना व उपक्रमाची योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या सर्व उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी रुपाली आवळे यांच्या अध्यक्षतेखाली  दि. 29 जुलै,2020 रोजी  निरीक्षण गृह समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा पुनर्वसन समिती, जिल्हा परिविक्षा का समिती सखी वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समिती व सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती या सर्व समितीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस  महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, अंजुम शेख, होम डी वाय एस.पी. शोभा कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ श्री.काशीद, सरकारी कामगार अधिकारी आर.जी. शिंगारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.शशिकांत अहंकारी, हॅलो मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.ए.डी. कदम, बालकल्याण समितीचे अध्यक्ष के.एस. मोटे, बाल कल्याण समिती सदस्य सुधीर कदम, सचिव निरीक्षक गृह शिक्षणाधिकारी श्रीमती कुंभार, कौशल्य विकास अधिकारी एस.आर. गुरव तसेच सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी इत्यादी उपस्थित होते.
 या प्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. निपाणीकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, परिविक्षा अधिकारी नितीन इरकल, विधी परिविक्षा अधिकारी शशिकांत पाटील, वैशाली पाटील, बाल संरक्षण अधिकारी सत्यवान तोरकर सादरीकरण केले.

 
Top