उस्मानाबाद/ प्रतिनिधी
माजी मुख्यमंञी मा.वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेञात त्यावेळी भरीव योगदान दिल्यानेच आपल्या राज्यात हरित क्रांती झाली होती आणि आज कृषी क्षेञाचा विकास त्यांच्या धोरणामुळेच होत आहे.त्यांनी त्या काळात कृषी विद्यापीठांना महत्व देवून विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मागर्गदर्शन करावे व त्यातूनच शेतकऱ्यांचा विकास साधावा आशी त्यांची भुमिका होती.
त्यांनी महाराष्ट्रा बरोबरच पुसद,यवतमाळ भागात शिक्षण व कृषीला महत्व दिले होते त्यामुळे कृषी झेञात वसंतराव नाईकांचे आसलेले योगदान महत्वाचे होते असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करतेवेळी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.
यावेळी संदिप देशमुख यांचे हस्ते वसंतराव नाईक यांचे  प्रतिमाचे पूजन करणेत आले होते.यावेळी प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर ,महाविद्यालयातील निवडक प्राध्यापक,कर्मचारी व सेवक उपस्थित होते.हा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेण्यात आला.सूञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.

 
Top